top of page
Search

सोशल मीडिया : तुमच्या IIT/AIIMS च्या प्रवासातील एक महत्त्वाचा अडथळा

भारतीय स्टार्टअप किंग अशनेर ग्रोव्हर यांनी अलीकडेच म्हटले आहे की “उद्योजक एक अतिशय मोठ्या प्रश्नाशी झुंजत आहेत: एक लक्ष्य केंद्रित कामगार कसा शोधायचा?” सोशल मीडियाच्या विचलनाने मोठ्या संख्येने असे लोक तयार केले आहेत ज्यांच्याकडे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे. याचे सर्व श्रेय जाते स्मार्ट फोनला, जे आपल्या सर्वांना  विचलित करत आहेत. सोशल मीडिया साइट्स/अ‍ॅप्सवर रील्स, शॉर्ट्स, पोस्ट्स पाहण्याच्या तात्काळ आनंदामुळे एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्यांच्याकडे दीर्घ कालावधीसाठी एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे त्यांनाच त्यांच्या करिअर मध्ये यश मिळेल यात शंका नाही.


सोशल मीडियाच्या विचलनाने मोठ्या संख्येने असे लोक तयार केले आहेत ज्यांच्याकडे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे
सोशल मीडियाच्या विचलनाने मोठ्या संख्येने असे लोक तयार केले आहेत ज्यांच्याकडे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे.

पण त्याचा IIT JEE किंवा NEET या सारख्या स्पर्धापरीक्षा क्रॅक करण्याशी कसा संबंध आहे? दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 10 लाख, 12 लाख, 14 लाख विद्यार्थी दरवर्षी या परीक्षा देत आहेत. आणि वर्षानुवर्षे हि संख्या वाढतच जात आहे. नाही. प्रत्यक्षात संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची  संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जेईई/नीट किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे बहुतेक विद्यार्थी आज एका गोष्टीशी संघर्ष करत आहेत: सोशल मीडिया. 2023 च्या NEET(नीट) टॉपरने जेव्हा हे सांगितले की त्याने तयारी दरम्यान 2 वर्षे स्मार्टफोनला स्पर्श केला नाही ते ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. इथून पुढच्या काळामध्ये तेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्क्स ने उत्तीर्ण होतील जे स्वतःला स्मार्ट फोन पासून दूर ठेवू शकतील. सोशल मीडियाच्या विचलनापासून दूर राहण्यासाठी आणि तुमचा फोकस वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पाहू या:


  1. तुमचा उद्याचा प्लॅन आज तयार असावा:


Time to Plan
जर तुम्ही योजना आखण्यात अयशस्वी असाल तर तुम्ही अयशस्वी होण्याची योजना कराल

सर्वेक्षणानुसार 70% लोक आपल्याला उद्या काय करायचंय याची योजना लिहित नाहीत. जर तुम्ही योजना आखण्यात अयशस्वी असाल तर तुम्ही अयशस्वी होण्याची योजना कराल. जर तुम्ही उद्याची योजना एक दिवस आधी तयार केली तर उद्या सकाळी तुम्हाला आज काय करायचे आहे याचा विचार करण्याची गरज नाही आणि मोबाइलची स्क्रीन स्क्रोल करण्यात वेळ न घालवता तुम्ही लगेच तुमच्या तयारीला सुरुवात करू शकता.


2. अभ्यासाबद्दल गंभीर असलेल्या मित्रांचा एक गट ठेवा:


Team study
अभ्यासातील मदतीसाठी मोबाईलकडे वळण्याऐवजी तुम्हाला अवघड वाटणारा विषय तुमच्या मित्राकडून समजून घेऊ शकता

IIT JEE किंवा NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र यासारख्या विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. साधारणपणे आपल्या कलानुसार एखादा विषय आपल्याला आवडतो. जर तुम्ही भौतिकशास्त्रात चांगले असाल तर तुम्ही तुमच्या मित्रांना त्या विषयात मदत करू शकता जे त्यात चांगले नाहीत आणि तुम्हाला अवघड वाटणारा विषय तुमच्या मित्राकडून समजून घेऊ शकता. गट अभ्यास प्रेरित राहण्यास मदत करतो आणि तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये मदतीचा हात देतो. मुद्दा असा आहे की अभ्यासातील मदतीसाठी मोबाईलकडे वळण्याऐवजी, जर तुम्हाला तुमच्या मित्र/शिक्षकांकडून ऑफलाइन मदत मिळाली तर अभ्यासातून आराम मिळवण्याच्या नादात तुम्ही रील्स/शॉर्ट्स/पोस्ट्स पाहण्यात हरवून जाण्याची  शक्यता कमी आहे. 


3. सोशल मीडियासाठी तुमच्या वेळापत्रकात विशिष्ट वेळ ठेवा:

मला माहित आहे की आजच्या युगात, सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणे आपल्यापैकी काहींसाठी अशक्य असू शकते. पण याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे असहाय्य आहोत. सोशल मीडियासाठी आपण आपल्या दिवसातील एक विशिष्ट वेळ (जास्तीत जास्त 1 तास) ठेवू शकतो, जेणेकरून आपण आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल जागरूक राहू शकतो. तुम्ही ठराविक तासांचा अभ्यास पूर्ण केल्यास हे बक्षीस म्हणून ठेवले जाऊ शकते. आदर्श वेळ रात्रीच्या जेवणापूर्वी फक्त 1 तास असेल जेणेकरून रात्रीच्या जेवणाची वेळ आली की तुम्हाला मोबाईल बाजूला ठेवावा लागेल. दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी हा 1 तासाचा ब्रेक ठेवू नका कारण तो मर्यादेपलीकडे वाढू शकतो आणि झोपण्यापूर्वी एक तासापेक्षा जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने झोपेचे विकार निर्माण होऊ शकतात.


4. ध्यान आणि व्यायाम करा:



Meditation and Exercise
व्यायामामुळे तणाव कमी होण्यास मदत होते

ध्यानधारणा ज्यामध्ये दीर्घ श्वास घेणे, मंत्र जप करणे, सुखदायक संगीत ऐकणे हे तुम्हाला तुमचे मन शांत करण्यास मदत करू शकते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की व्यायामामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते जे तुमच्या JEE/NEET प्रवासात खूप महत्वाचे आहे. हे तुमचा मूड सुधारण्यास आणि एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करते. बागेत किंवा मोकळ्या जागेवर अर्धा तास साधे चालणे देखील तुम्हाला तणाव कमी करण्यास आणि तुमचा मूड सुधारण्यास मदत करू शकते.


5. सोशल मीडिया वापर नियंत्रण अ‍ॅप्सचा उपयोग करा.



Use social medial usage control Apps
सोशल मीडिया वापर नियंत्रण अ‍ॅप्सचा उपयोग करा.

आपण कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा आपण मोबाईलचा अतिवापर करतो आणि सोशल मीडिया मुळे विचलित होण्यात बराच वेळ वाया घालवतो. त्यामुळे यापासून दूर ठेवण्यासाठी इथे तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आपण काही अ‍ॅप्सचा वापरू करू शकतो जे आपल्याला स्क्रीन टाइम नियंत्रणात ठेवण्यास किंवा कोणत्याही विशिष्ट एप्सचा वापर मर्यादित ठेवण्यास मदत करते.


6. तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला जबाबदार रहा:

तुमच्या प्रिय व्यक्तीला: आई/ वडील किंवा तुमची खूप काळजी घेणार्‍या इतर नातेवाईकांना दररोज संदेश पाठवा. तुम्ही किती वेळ अभ्यास केला, मोबाईलवर किती वेळ घालवला, झोपेसाठी किती वेळ गेला आणि दिवसभरात इतर कोणताही मोठा वेळ खर्च झाला ते लिहा. आता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला उत्तरदायी असल्याने, मोबाईलवर टाइमपास करण्याचा विचार तुमच्या मनात आल्यावर तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल कारण तुम्हाला मेसेज मध्ये टाइमपास झाला असे लिहून त्या व्यक्तीला नाराज करायचे नाही.


लक्षात ठेवा समस्या स्मार्टफोनची नाही, तर तुमचे मन समस्या निर्माण करत आहे. मला आशा आहे की तुम्हाला सोशल मीडियाच्या विचलनापासून दूर राहण्यासाठी पुरेशा टिप्स मिळाल्या असतील. माझ्यावर विश्वास ठेवा, कोणत्याही विचलित करणाऱ्या गोष्टीची पर्वा न करता तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही आज घेतलेला हा एक निर्णय तुमच्या IIT/AIMMS च्या प्रवासात मोठा बदल करणारा ठरणार आहे. तुम्हा सर्वांना तुमच्या IIT/AIMMS च्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.


आम्ही विद्यासरिता अकॅडमी पुणे येथे, JEE/NEET/MHT-CET तयारीसाठी एकात्मिक निवासी सुविधा पुरवतो, ज्याद्वारे IIT/IIIT/NIT आणि AIIMS/GMC ह्या प्रथितयश संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबत सातत्याने उत्कृष्ट निकाल दिले आहेत. विद्यासरिता अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत करताना आम्हाला अधिक आनंद होईल जिथे आम्ही टॅब आधारित डिजिटल तंत्रज्ञानासह सोशल मीडिया विचलित मुक्त आरोग्यदायी वातावरण प्रदान करतो. अधिक माहितीसाठी www.vidyasarita.in वर तपशील पहा.

167 views0 comments
bottom of page